पाहून थक्क व्हाल, “शिवप्रताप गरुडझेप” हा चित्रपट पाहवाच !

निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू बहुत जनांसी आधारू श्रीमंतयोगी असे श्री समर्थ रामदास स्वामी ज्यांचा विषयी शब्द उचारतात ते म्हणजे राजा शिवछत्रपती. ज्यांच्या कहाण्या ऐकून आपण प्रेरित होतो ज्यांचा युद्धाचा गाथा ऐकून आपल्याला घाम फुटतो.एक युग पुरुष. जे राजे आपल्याला स्वतंत्रपणे जगायला शिकवतात, स्वाभिमानाने जगायला शिकवतात, दुसऱ्यांची मदत करायला शिकवतात, निर्भयपणे जगायला शिकवतात अश्या क्षत्रिय कुलावतंस श्रीमंतयोगी शिवछत्रपती राजांबद्दल ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट आहे.

या चित्रपटात शिवाजी महाराजांबद्दल एक प्रसंग मांडण्यात आला आहे. भयानक अतभूत तो प्रसंग म्हणजे “आग्र्याहून सुटका “.

हा चित्रपट महाराजांची “आग्र्याहून” झालेली सुटका या वर आधारित आहे. महाराजांनी एक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्याचे रूपांतर सत्यात केले.हिंदवी स्वराज्य तयार करतांना महाराजां समोर प्रचंड संकटे होती. या संकटांन मधुनच एक मोठे संकट म्हणजे औरंगजेबाने केलेली महाराजांना नजरकैद.शाहिस्तेखानाची बोटे छाटल्या नंतर व सुरतेवर लूट केल्यानंतर औरंगजेब चवताळला व शिवरायांचा समोर औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग हे संकट उभे केले होते. व त्या संकटात शिवरायांनी स्वराज्याचा हितासाठी पुरंदराचा तह केला. व त्या तहअंतर्गत शिवरायांना औरंगजेबाने आग्र्याला भेटीला बोलावले.

औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा अपमान झाला म्हणून महाराज संतप्त होऊन निघून गेले.महाराजांना दग्याने मारण्याच्या हेतूने महाराजांना नजर कैद करण्यात आले. त्यांच्या सुट्टकेचे सगळे मार्ग बंद करण्यात आले.पण तरीही बुद्धीचा कुशल वापर करून महाराज अग्र्याहून निसटले आणि स्वराज्यात परतले. हा संपूर्ण प्रसंग “शिवप्रताप गरुडझेप” या चित्रपटात मांडला आहे.अग्र्याला रोमांचकारी असा हा प्रसंग घडला आहे.त्यावर आधारित एक छान पटकथा बनवण्यात आले आहे.या पटकथेत देखील उणीव राहिल्या आहेत.”शिवप्रताप गरुडझेप” हा चित्रपट कार्तिक केंढे यांनी दिग्दर्शित केला आहे.

डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवरायांची भूमिका साकारली आहे. डॉक्टर कोल्हे यांना शिवरायांचा भूमेकीचा खूप मोठा अनुभव आहे. महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलु त्यांनी साकारले आहेत. अतिशय उत्तम अभिनय त्यांनी केला आहे. प्रतीक्षा लोणकर यांनी जिजामाता यांची भूमिका उत्कृष्ट पणे साकारली आहे.यतिन कार्येकर यांनी औरंगजेब यांची भूमिका बजावली आहे. औरंगजेबाच्या गर्विष्ठपणा, खुनशी,अहंकार पणाचा अंत्यत उत्तम प्रकारे अभिनय केला आहे.उर्वरित कलाकारांनी देखील उत्तम प्रकारे अभिनय केला आहे.

शिवरायांचे चरित्र प्रेरणादायक आहे.त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आदर्श आहे. त्यांच्या अफाट पराक्रम माणसाला धाडसी वृत्ती शिकवते. शिवरायांचा आग्र्याच्या सुट्टकेच्या धाडसी पराक्रम पाहवाच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *